पतीच्या ऐवजी पत्नी अन्‌ पत्नीच्या ऐवजी पती; जामखेड नगरपालिका निवडणुकीचे प्रभागनिहाय आरक्षण

वसंत सानप 
Friday, 27 November 2020

जामखेड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता निघालेल्या आरक्षणाच्या सोडतीत विद्यमान नगराध्यक्ष निखिल घायतडक यांचा प्रभाग क्रमांक २० नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाला आहे.

जामखेड (अहमदनगर) : जामखेड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता निघालेल्या आरक्षणाच्या सोडतीत विद्यमान नगराध्यक्ष निखिल घायतडक यांचा प्रभाग क्रमांक २० नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांना प्रभाग बदलावा लागणार आहे. सुदैवाने त्यांचा पारंपरिक प्रभाग क्रमांक-14 अनुसूचित जाती व्यक्ती करिता आरक्षित झाल्याने त्यांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

यावेळी त्यांना येथून निवडणूक लढवावी लागणार आहे. इतरत्र फारसे बदल नाहीत. 
2015 च्या आरक्षणातील पतीच्या ऐवजी पत्नी आणि पत्नी ऐवजी पती असे बदल विद्यमान नगरसेवकांना 2020 मध्ये असे बदल स्विकारावे लागतील, असे आरक्षण निघाले आहे. शुक्रवार (ता. 27) जामखेड तहसीलच्या प्रांगणात प्रांताधिकारी अर्चना नष्टेंच्या प्रमुख उपस्थितीत जामखेड नगरपालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष निखिल घायतडक, मुख्याधिकारी नेमिनाथ दंडवते, तहसीलदार विशाल नाईकवडे आदींसह नगरसेवक नागरिक उपस्थित होते .

यावेळी निघालेले प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे :
प्रभाग क्रमांक एक- सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक दोन- सर्वसाधारण महिला, 
प्रभाग क्रमांक तीन- सर्वसाधारण व्यक्ती,
प्रभाग क्रमांक चार- नागरीकांचा मागास प्रवर्ग,
प्रभाग क्रमांक पाच- सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक सहा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
प्रभाग क्रमांक सात- सर्वसाधारण महिला ,
प्रभाग क्रमांक-8 अनुसूचित जाती महिला.
प्रभाग क्रमांक -9 सर्वसाधारण व्यक्ती ,
प्रभाग क्रमांक -10 सर्वसाधारण महिला,
प्रभात प्रभाग क्रमांक- 11 सर्वसाधारण व्यक्ती,
प्रभाग क्रमांक 12- सर्वसाधारण व्यक्ती,
प्रभाग क्रमांक -13 सर्वसाधारण महिला ,
प्रभाग क्रमांक- 14 अनुसूचित जाती व्यक्ती,
प्रभाग क्रमांक 15- नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती,
प्रभाग क्रमांक 16- सर्वसाधारण व्यक्ती,
प्रभाग क्रमांक 17 -नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती,
प्रभाग क्रमांक 18-  सर्वसाधारण महिला प्रभाग,
प्रभाग क्रमांक 19 -सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक 20- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
प्रभाग क्रमांक 21 नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण निघाले आहे.

मी प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करिता आरक्षित झाल्याने आपणास अन्य प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे.  प्रभाग क्रमांक- 14 हख अनुसूचित जाती व्यक्ती करिता आरक्षित झाल्याने आपणासमोर येथू निवडणूक लढविण्याचा पर्याय आहे. प्रभाग क्रमांक 20 आणि 14 चा काही भाग पूर्वी ग्रामपंचायतीचा वार्ड क्रमांक-02 होता.त्यावेळी माझे आजोबा मारुती घायतडक दहा वर्षे या भागातून सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करित होते.तसेच आमचे वास्तव माझ्या जन्मापर्यंत तेथेच होते.त्यामुळे प्रभाग-14 हा माझ्या करिता नवीन नाही. "
- निखिल घायतडक, नगराध्यक्ष जामखेड    

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ward reservation for Jamkhed municipal elections