पारनेर नगरपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर, दिग्गजांची झाली गोची

मार्तंड बुचुडे
Tuesday, 10 November 2020

अनेकांच्या प्रभागात उलथापालथ झाल्याने अनेकांची नाराजी झाली तर काहींना मात्र लॉटरी लागली आहे.

पारनेर ः  पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती,  महिला प्रवर्ग राखीव, नागरिकांचा व स्त्रीयांचा मागास प्रवर्ग तसेच उर्वरीत खुल्या प्रवर्गासाठी सोडत जाहीर करण्यात आली.

यात अनेकांच्या प्रभागात उलथापालथ झाल्याने अनेकांची नाराजी झाली तर काहींना मात्र लॉटरी लागली आहे. विद्यामान नगराध्यक्ष वर्षा नगरे यांचा प्रभाग  खुला तर माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांचा प्रभाग राखीव झाल्याने त्यांची मोठी  पंचायत  झाली आहे.
    आज (ता. 10 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्या उपस्थीतीत राखीव जागा व तसेच महिलांसाठीच्या व इतर राखीव जागांसाठी चे आरक्षण सोडत डॉ.आंबेडकर भवन  येथे काढण्यात आली.
नगरपंचायतीचे सतरा प्रभागांचे आरक्षण या वेळी भोसले यांनी जाहीर केले. यात अरक्षणाच्या बदलामुळे अनेकांचा हिरमोड झाला तर काहींना आनंद झाला.  या प्रामुख्याने नगराध्यक्ष वर्षा नगरे यांचा प्रभाग खुला झाला आहे तर माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांचा प्रभाग राखीव झाल्याने या दोघांचीही मोठी पंचायत झाली आहे.नविन आरक्षण पुढील प्रमाणे,  
  प्रभाग  एक नागरीकांचा मागास प्रवर्ग ( सर्वसाधारण  ) ,प्रभाग दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग(स्त्री राखीव),प्रभाग तीन सर्वसाधारण (स्त्री राखीव),प्रभाग चार सर्वसाधारण ( स्त्री/पुरुष ),प्रभाग पाच सर्वसाधारण (  स्त्री/पुरुष),प्रभाग  सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव),प्रभाग  सात सर्वसाधारण ( स्त्री/पुरुष), प्रभाग आठ अनुसूचित जाती(सर्वसाधारण),प्रभाग नऊ  सर्वसाधारण (स्त्री राखीव), प्रभाग दहा सर्वसाधारण (स्त्री/पुरुष), प्रभाग 11 नागरिकांचामागास प्रवर्ग (स्त्री राखीव),प्रभाग 12 सर्वसाधारण (स्त्री/पुरुष),प्रभाग 13 सर्वसाधारण (महिला राखीव) ,प्रभाग  14 नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण),प्रभाग 15 सर्वसाधारण (महिला राखीव),प्रभाग 16 सर्वसाधारण (स्त्री राखीव),प्रभाग 17 सर्वसाधारण (महिला राखीव )या नुसार आरक्षण जाहीर झाले आहे.तसेच याच वेळी नव्याने बदल झालेली प्रभाग रचनाही जाहीर करण्यात आली आहे.
    या आरक्षणामुळे अनेकांची दावेदारी संपुष्टात आली आहे. तर काही पतीरांजाना पत्नीच्या जागेवर संधी मिळाली आहे. त्यामुळे काहींना फायदा झाला  आहे तर काही पतीराजांना  अता आपल्या पत्नी किंवा मातोश्रींना उमेद्वारी द्यावी लागणार आहे. 
    
 तसेच   विद्यमान नगराध्यक्ष नगरे यांचा प्रभाग खुला , उपनगराध्यक्ष  दत्ता कुलट यांच्या प्रभाग  दोन मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग(स्त्री राखीव) आहे. नगरसेवक चंद्रकांत चेडे यांचा प्रभाग सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव) झाला आहे माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांच्या प्रभागात अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ward wise reservation of Parner Nagar Panchayat announced