आठ वर्षापूर्वी शंकरराव गडाखांनी राबवलेल्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना होतोय फायदा

Water Conservation Minister Shankarrao Gadakh The water conservation project implemented in Newase taluka is benefiting the farmers.jpg
Water Conservation Minister Shankarrao Gadakh The water conservation project implemented in Newase taluka is benefiting the farmers.jpg
Updated on

सोनई (अहमदनगर) : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आठ वर्षापूर्वी आमदार असताना नेवासे तालुक्यात राबविलेला जलसंधारण उपक्रम आज दहा हजाराहून अधिक शेतक-यांना 'लाभ'दायक ठरत आहे. ३४० बंधारे दुरुस्तीचा निर्णय सर्वांसाठी आता आर्थिकस्तर उंचविणारा ठरला आहे. 

नेवासे तालुका स्वतंत्र विधानसभा मतदार संघ झाल्यानंतर गडाख पहिल्यांदा आमदार झाले. जलसंधारण कामाची आवड म्हणून त्यांनी सन २०१३ मध्ये तालुक्यातील साठवण बंधारे १५५, पाझर तलाव १७, गावतळी २३ आणि साखळी बंधारे १४५ चे रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणेसह दुरुस्तीचे काम केले होते.

मुळा कारखाना, शनैश्वर देवस्थानबरोबरच विविध संस्था व लोकसहभागातून ३४० बंधा-यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले होते. याकामातून काढलेला साडेतेरा लाख ब्रास गाळ बाराशे एकर शेतात टाकण्यात आला होता. बंधा-याची खोली वाढविल्याने अनेक वाड्या-वस्त्यांचे स्थलांतर वाचले होते. याशिवाय याकामामुळे अनेक गावातील पाण्याचे टॅंकर बंद झालेले आहेत.

शेतकरी हिताचे एवढे मोठे काम करुनही गडाख सन २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत पराभूत झाले. आमदार नसतानाही त्यांनी कालव्यास आवर्तन सुटल्यानंतर सर्व बंधारे भरुन घेण्याचे मोठे काम केले होते. यासह सर्व घटकांसाठी केलेल्या कामामुळे ते पुन्हा आमदार झाले. सरकारमध्ये त्यांना  मिळालेले जलसंधारण मंत्रीपद खरोखर योग्य न्याय असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत.

आठ वर्षांपूर्वी केलेल्या बंधारे दुरुस्तीमुळे सातशे दशलक्ष घनफूट पाणीक्षमता वाढली होती. याच कामामुळे अनेक पडीक जमिनीवर उसाचे पीक डौलत आहे. अनेक शेतक-यांचा आर्थिकस्तर उंचावला असून उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात बंधारे भरुन घेण्यासाठी आठ वर्षापूर्वी गडाखांच्या प्रयत्नातून झालेली दुरुस्ती उपयोगी पडत आहे. 

सोनईतील कौतुकी नदीपात्रातील सर्व साखळी बंधारे दुरुस्त केल्याने पाणीक्षमता वाढली आहे. अडचण असताना आवर्तनातून बंधारे भरुन घेतले जात असल्याने शेतीसह दुग्धव्यावसाय टिकून आहे. 
- संजय कचरु दरंदले, शेतकरी, सोनई 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com