Water issue highlight : पठार भागाचा पाणीप्रश्‍न ‘हायलाईट’; काशिनाथ दातेंचा अजित पवारांकडे पाठपुरावा

Ahilyanagar News : नागपूर हिवाळी अधिवेशनानिमित्त आमदार दाते यांनी मतदारसंघातील विविध मुद्यांवर चर्चा केली. या चर्चेतील पठार भागाच्या प्रलंबित असणारा पाणीप्रश्‍नासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दाते व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी स्वतंत्र भेट घेत चर्चा केली.
 Kashinath Date following up with Ajit Pawar
Kashinath Date following up with Ajit PawarSakal
Updated on

टाकळी ढोकेश्‍वर : पारनेर-अहिल्यानगर मतदासंघातील नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांनी विविध प्रलंबित प्रश्‍नांवर ‘सकाळ’ अहिल्यानगर कार्यालयात संपादकीय विभागाशी संवाद साधत पठार भागाचा वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा पाणीप्रश्न सोडवणार, असे म्हणात त्यांनी हा प्रश्‍न प्रकाशझोतात आणला होता. हाच मुद्दा आमदार दाते यांनी विधानसभेत उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे हा मुद्दा हायलाईट झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com