esakal | नो टेन्शन! आढळा जलाशय भरले, २५ गावांचा पाणी प्रश्‍न मिटला
sakal

बोलून बातमी शोधा

The water problem of 25 villages has been solved

आढळा भागाची जीवनदायिनी म्हणजे आढळा नदीवर बांधण्यात आलेले आढळा जलाशय! १०६० दशलक्ष घनफूट पूर्ण क्षमतेने भरले आहे.

नो टेन्शन! आढळा जलाशय भरले, २५ गावांचा पाणी प्रश्‍न मिटला

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : आढळा भागाची जीवनदायिनी म्हणजे आढळा नदीवर बांधण्यात आलेले आढळा जलाशय! १०६० दशलक्ष घनफूट पूर्ण क्षमतेने भरले आहे. शेतकऱ्यांनी जल्लोष करत या जलाशयाचे पूजन करून समाधान व्यक्त केले आहे. तर निळवंडे जलाशय तांत्रिकदृष्ट्या तर सकाळी ६ वाजता भंडारदरा जलाशय ११०३९ दशलक्ष घनफूट क्षमतेने भरले आहे.

भंडारदरामधून ७७४०, वाकी जालशयातून २५४५ तर निळवंडेमधून १२९४५ क्युसेकस वेगाने विसर्ग सुरू असल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. आज दुपारी १२ वाजता आढळा जलाशय पूर्ण क्षमतेने भरले. मागील आठवड्यात आढळा नदीवरील सांगवी, पाडोशी, टिटवी पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातील विसर्ग आढळा जलाशयात वेगाने जमा झाल्याने आज हे धरण पूर्ण भरले आहे.

या जलाशयावर दुष्काळी  २५ गावे अवलंबून आहेत. त्यामुळे या परिसरातील वीरगाव, हिवरगाव, देवठाण, जवले, डोंगरगाव, गणोरे, जवळे कडलग, संगमनेर येथील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत साडी- चोळी, श्रीफळ अर्पण करून जलपूजन केले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
या जलाशयावर ३९१४ हेक्टर क्षेत्र भिजते. ९७५ दशलक्ष घनफूट सिंचनासाठी उपयुक्त पाणीसाठा असून ८५ दशलक्ष घनफूट मृत पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रातील छोटही मोठी बंधारे लघुपाटबंधारे  भरल्याने आढला नदी वाहते. झाल्याने आज आढळा जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे.

यापूर्वी बदगी बेलापूरसह ११ जलाशय भरल्याने तालुक्यात पाणी फुल्ल झाले आहे. आढळा जलाशय भरल्याने सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटोळे यांनी समाधान व्यक्त करताना ही आमची जीवनदायिनी आहे. आमचे दुष्काळी गावे यामुळे जीवन जगतात असे ते म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर