जयंत पाटलांच्या दौऱ्याचं गुपीत उलगडलं, तनपुरेंनी सांगितलं कारण

जयंत पाटलांच्या दौऱ्याचं गुपीत उलगडलं, तनपुरेंनी सांगितलं कारण
Summary

तनपुरे म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारने निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी प्राधान्य दिले आहे"

राहुरी (अहमदनगर) : निळवंडे धरणाच्या (nilwande dam) कालव्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water resources minister jayant patil) यांनी शनिवारी दौरा केला. कुठेही उद्घाटनाचा कार्यक्रम नव्हता. अधिकार्‍यांवर दबाव राहावा. कामे जलद व्हावीत. शेतकऱ्यांना लवकर पाणी मिळावे, असा त्यामागे उद्देश आहे. कोरोनामुळे गर्दी नको, यासाठी लोकप्रतिनिधींना निमंत्रण नव्हते. कोणीही गैरसमज करू नये, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे(Minister of State for Urban Development Prajakta Tanpure) यांनी सांगितले.(Water resources minister jayant patil had come to rahuri to inspect the canal work of nilwande dam)

जयंत पाटलांच्या दौऱ्याचं गुपीत उलगडलं, तनपुरेंनी सांगितलं कारण
राहुरी विद्यापीठाचा आंबा लय गोड! आमराईतून कमावले एक कोटी

रविवारी राहुरी कृषी विद्यापीठ येथे पत्रकार परिषदेत मंत्री तनपुरे बोलत होते. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या दौऱ्यात निमंत्रण दिले नाही. म्हणून नाराजी व्यक्त करताना कोरोना काळात गर्दी केल्याने मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात व प्राजक्त तनपुरे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. त्यावर मंत्री तनपुरे यांनी वरील खुलासा केला.

जयंत पाटलांच्या दौऱ्याचं गुपीत उलगडलं, तनपुरेंनी सांगितलं कारण
राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांचे निलंबन रद्द

तनपुरे म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारने निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी प्राधान्य दिले आहे. कोरोना काळात निधीची टंचाई असताना निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे वेगाने प्रगतीपथावर आहेत. भाजपा सरकारच्या काळात कालव्यांची बांधकामे अवघी ९ टक्के झाली. ८१ टक्के बांधकामे शिल्लक होती."

मागील दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने वेगाने कामे करून ४७ टक्के बांधकामे पूर्ण केली. १८ टक्के बांधकामे प्रगतीत आहेत. ३५ टक्के कामे शिल्लक आहेत. निळवंडे उजव्या कालव्याच्या शेवटच्या टोकाकडील राहुरी तालुक्यातील गावे वंचित राहू नयेत. कालव्याची कामे जलद गतीने करावीत. यासाठी जलसंपदा मंत्री पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत आहे."

जयंत पाटलांच्या दौऱ्याचं गुपीत उलगडलं, तनपुरेंनी सांगितलं कारण
राहुरी कृषी विद्यापीठाचे मॉडेल देईल एकरी पाच लाखांचे उत्पन्न

"कोरोना लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. कोरोना काळात राजकारण करायचे नाही. परंतु, सिरमला लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने उशिरा आर्थिक मदत केली. अमेरिका व इतर देशांनी मागील वर्षी लस पुरवठ्याच्या ऑर्डर दिल्या. केंद्र सरकारने उशीर केला. त्यामुळे लसीच्या तुटवडा भासत आहे. लसीकरणासाठी गर्दी वाढत असून नियोजन कोलमडत आहे, असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. (Water resources minister jayant patil had come to rahuri to inspect the canal work of nilwande dam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com