
-मार्तंड बुचुडे
पारनेर : पारनेर तालुक्यातील आगामी काळातील पाणीटंचाईचा विचार करता व गेली तीन वर्षांतील पाणीटंचाई भासणाऱ्या गावांची पाहणी करून पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार तालुक्यातील ४० गावे व २३० वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाई भासणार आहे, असा अंदाज आहे. तशा आशयाचा पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी या काळात सुमारे एक कोटी ३० लाख रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.