Water Source : पठारी भागातील बारमाही वाहणारा नैसर्गिक झरा; अनेक कुटुंबांची भागते तहान

Water Source
Water Source

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील दुर्गम ठिकाणी असलेल्या हिवरगाव पठार अंतर्गतच्या पायरवाडी परिसरातील बारमाही नैसर्गिक झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे या वाडीसह अनेक कुटूंबाची पिण्याच्या शुध्द पाण्याची गरज भागते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही सुविधा अद्यापही वापरात आहे.

Water Source
Inspirational : शेतकऱ्यांच्या लेकींची गणगभरारी! दोघी सख्ख्या बहिणींची पोलिस दलात निवड

हिवरगाव पठार या गावांतर्गत पायरवाडी, सुतारवाडी, गिऱ्हेवाडी, दगडसोंड वाडी, कोळेवाडी व शेंगाळवाडी या सहा छोट्या वाड्या आहेत. या सर्व वाड्यांमध्ये ठाकर या आदिवासी समाजाची एकूण लोकसंख्या केवळ हजार ते अकराशे आहे.

हिवरगाव पठार पासून रस्त्याने पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पायरवाडी या वाडीलगत घाटमाथ्यावर सुमारे ३०० मीटर अंतरावर खडकातील कपारीतून बारमाही वाहणारा जिवंत पाण्याचा झरा गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे.

उन्हाळ्यातही या झऱ्याचे पाणी केवळ कमी होते, पूर्ण आटत मात्र नाही. कपारीतून पाझरणारे पाणी लगतच्या खोलगट खड्ड्यात साचते. ते लहान भांड्याने भरुन घेतले जाते. मागील काही वर्षांपूर्वी या वाड्या वस्त्यांसाठी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु होते. या गावासाठी शासनाच्या योजनेतून पिण्याच्या पाण्याच्या दोन योजना व पाईपलाईनसह उंच पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत.

Water Source
Sharad Pawar: "उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द शरद पवारांनी समोर आणलाय"

या पैकी पहिली योजना २००५ - २००६ साली मागासवर्गिय क्षेत्रासाठीच्या पाणीपुरवठा योजनेतून हिवरगाव जवळच्या उंच पठारावर ३५ हजार लिटर्स क्षमतेची उंच टाकी बांधण्यात आली. तर २०११ - २०१२ सालच्या भारत निर्माणच्या योजनेतून माळवाडी गावठाणात ५० हजार लिटर्स क्षमतेची टाकी बांधण्यात आली आहे.

या दोन्ही योजनांसाठी गावठाणात भरपूर पाणी असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीच्या उद्भवाचा वापर करण्यात येतो. सहा वाड्यांसाठी साडेचार हजार फुटांची पाईप लाईन करुन या वाड्यांना पाण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र कमी व्होल्टेज, विजपंप जळणे किंवा पाईप लाईन फुटणे यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय आल्यास या परिसरातील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची गरज हाच झरा भागवतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com