नगरमधील जलस्त्रोत होणार गाळमुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Water sources in Ahmednagar will be sludge free
Water sources in Ahmednagar will be sludge free
Updated on

नेवासे : नगर जिल्ह्यातील शंभर जलस्त्रोतांमधील गाळ काढून त्यांना गाळमुक्त धरण करण्याचे नियोजन असून त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले हे भेंडे (ता. नेवासे) येथील शासकीय कोविड सेंटरची पहाणी करण्यासाठी आले असता जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे जलपमित्र सुखदेव फुलारी यांनी राज्यात व जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजागृती अभियानाच्या अनुषंगाने संवाद साधला. (ता. 16 ते 22) मार्च या कालावधीत राबविलेल्या जलजागृती कार्यक्रमांची माहिती दिली.

या वेळी तहसीलदार रुपेश सुराणा उपस्थित होते. 
यावेळी जिल्ह्यातील जलसाक्षरता चळवळ आणि शासकीय इमारतीवरील रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे होत असलेले दुर्लक्ष बाबत जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले असता डॉ.भोसले म्हणाले, जलयुक्त शिवार,पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या जिल्ह्यात यापूर्वी लोकसहभागातून कामे झालेली आहेत.

ही उपमुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली जलसंधारणावर बैठक झाली. त्यात भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतलेला आहे. जिल्ह्यात जवळपास 100 जलस्त्रोतांमधील गाळ काढून त्यांना गाळमुक्त धरण करण्याचे नियोजन असून त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पाण्याचे महत्व कोणाला नव्याने सांगण्याची गरज नाही. पाणी हे आपले भविष्य आहे. त्याला वाचविणे, त्याचे संरक्षण-संवर्धन करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे.

शासकीय व खाजगी इमारतीवरील रेनवॉटर हार्वेस्टिंग बाबत बोलतांना डॉ. भोसले म्हणाले, माझी वसुंधरा हा नवीन कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. नवीन बांधकाम होणाऱ्या घरांसाठी-इमारतींसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे सक्तीचे आहे. जुन्या इमारतींवर जिथे जिथे शक्य आहे. तिथे तिथे नावीन्यपूर्ण योजनेतून रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कशी कार्यान्वयीत करता येईल याकडे ही लक्ष दिले जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com