

Fear Grips Village as Snakes Found in Public Water Tank
Sakal
राजूर: राजूरला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत चक्क दोन साप आढळून आले. या घटनेनंतर टाकीच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. सध्या ग्रामस्थांना पाच दिवसांनी म्हणजेच महिन्यातून पाच ते सहा वेळा पाणी मिळत आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास ग्रामपंचायत प्रशासनाला वेळ मिळत नाही का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून उपस्थित करण्यात येत आहे.