
श्रीरामपूर : शहाराची वाढत्या लोकसंख्येबरोबर भविष्यातील २५ वर्षांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता विस्तारित पाणीपुरवठा योजनेसाठी १७८ कोटी ६० लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. त्यातून दुसऱ्या साठवण तलावाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. येत्या १८ महिन्यांत काम योजनेचे पूर्ण करावयाचे आहे. नवीन योजनेमुळे साठवण तलावांची क्षमता ७७५ दशलक्ष लिटरवरून १३५० दशलक्ष लिटरपर्यंत वाढणार आहे. एकदा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ८५ ते ९० दिवस शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल.