
अकोले : निळवंडे धरणातून सध्या १७०० क्युसेक वेगाने प्रवरा नदीत पाणी सोडले आहे. गेल्या महिन्यापासून सुरू असलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन कायम ठेवण्यात आले असून या विसर्गामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठ्याला मदत होणार आहे. नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत १४ बंधारे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.