नगर शहराच्या पाण्याचा पुन्हा खेळखंडोबा, कारण तेच नेहमीचं

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळतीचे दुरुस्तीचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतलेले आहे.

नगर ः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा नगर येथील पंपिंग स्टेशवरील मुख्य जलवाहिनीला गळती लागलेली आहे. या गळतीच्या दुरुस्तीचे काम 14 नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे. 

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळतीचे दुरुस्तीचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतलेले आहे. त्यामुळे या दुरुस्तीच्या काळात महापालिकेकडून पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. 

हेही वाचा - नगर शहराचे कलेक्टर राहतात महालात

सोमवार (ता. 14)ला शहरातील स्टेशन रस्ता, विनायक नगर, आगरकर मळा, बालिकाश्रम रस्ता, सावेडी उपनगर आदी भागात सकाळी अकरानंतर पाणी पुरवठा होणार नाही. या भागास मंगळवारी (ता. 15)ला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. 

मंगळवारी (ता. 15) ला रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागातील झेंडी गेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा, सारसनगर, बुरुडगाव, सावेडी उपनगर आदी भागास पाणी पुरवठा होणार नाही. बुधवार (ता. 16)ला या भागात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. 

सिद्धार्थ नगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रस्ता, तोफखाना, नालेगाव, कापड बाजार, आनंदी बाजार, स्टेशन रस्ता, विनायक नगर आदी भागात बुधवार (ता. 16)ला पाणी पुरवठा होणार नाही. या भागास गुरुवार (ता. 17)ला पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply problem in Ahmednagar city again