गोदावरी नदीवरील पर्यायी पाणी योजनेच्या विहीरीत विद्युत पंप टाकुन पुणतांबेचा पाणी पुरवठा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

डिसेंबर गोदावरी कालव्याचे पाण्याचे अर्वतन लांबल्यामुळे, ग्रापंचायत प्रशासनाने गोदावरी नदीवरील पर्यायी पाणी योजनेच्या विहीरीत दोन विजपंप टाकुन पाणी पुरवठा सुरळीत केला आहे.

पुणतांबे (अहमदनगर) : डिसेंबर गोदावरी कालव्याचे पाण्याचे अर्वतन लांबल्यामुळे, ग्रापंचायत प्रशासनाने गोदावरी नदीवरील पर्यायी पाणी योजनेच्या विहीरीत दोन विजपंप टाकुन पाणी पुरवठा सुरळीत केला आहे. पाणी वाटप सर्व प्रभागात सारखे व्हावे, यासाठी पाणी पुरवठा विभाग कर्मचा-यांची बैठक पार पडली.

ग्रामस्थांनी पाणी ऊकळुन गार करुन प्यावे, असे आवाहन सरपंच डॉ. धनंजय धनवटे. ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी केले आहे. 
कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन असणाऱ्या या गावचा साठवण तलाव १५ दिवसापासुन कोरडा पडला आहे. गोदाकाठावर असलेल्या पर्यायी पाणी योजना विहीरीत एकच विजपंप होता. त्यामुळे पाणी टंचाई जानवत होती. परंतु पंचायत प्रसासनाने पाणी टंचाई लक्षात घेऊन तातडीने विहीरीत आज दोन विजपंप टाकले. पाणी पुरवठा सुरळीत केला. चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल असे सांगन्यात आले.

यापुढे साठवण तालावातील पाणी काटकसरिने वापरन्याच्या सुचना पाणी पुरवठा कर्मचा-यांना देण्यात आल्या. पाणी वाटप करतांना वेळेची दक्षता बाळगन्यात यावी. अशी सुचना सरपंच डाँ धनवटे.यांनी केली. पाणी वाचवल्यास साठवण तलावातील पाणी जास्त दिवस पुरन्यास मदत होईल. असे त्यांनी पाणी पुरवठा कर्मचा-यांना सांगीतले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदिप धनवटे. गोदामाई प्रतिष्ठाण अध्यक्ष विजय धनवटे. कुमार हासे.आदी मान्यवर हजर होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply at Puntambe is smooth