
अहिल्यानगर : जिल्ह्यात यंदा उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. तापमानाने चाळीशीने ओलांडली आहे. परिणामी पाणीपातळी खालावली आहे. बहुतांश धरणे खपाटीला गेले आहेत. सर्व जलस्त्रोत आटल्याने पाणी योजना बंद पडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात टँकरची मागणी वाढत आहे. टँकरने शंभरी पार केली आहे. सुमारे एक हजार कोटींच्या खर्चाच्या जलजीवन योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.