esakal | मुळा धरण भरण्याच्या मार्गावर, इतका झालाय साठा
sakal

बोलून बातमी शोधा

On the way to fill the radish dam, there are so many stocks

मुळा धरणात आज सायंकाळी सहा वाजता लहित खुर्द (कोतुळ) येथे नदीतून 11 हजार 152 क्‍यूसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. मुळा धरणामुळे राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यातील 85 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले. 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणावर लाखो शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून आहेत.

मुळा धरण भरण्याच्या मार्गावर, इतका झालाय साठा

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठे मुळा धरण आज सायंकाळी सहा वाजता 82 टक्के भरले. धरणसाठा 21 हजार 247 दशलक्ष घनफूट झाला. मागील अडीच महिन्यात धरणात 14 हजार 281 दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. मागील आठ दिवसांपासून धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरू आहे. पुढील आठ-दहा दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास, महिनाअखेरीस धरण भरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. 

मुळा धरणात आज सायंकाळी सहा वाजता लहित खुर्द (कोतुळ) येथे नदीतून 11 हजार 152 क्‍यूसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. मुळा धरणामुळे राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यातील 85 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले. 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणावर लाखो शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून आहेत. धरणाच्या पाण्यावर दक्षिण नगर जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होते. पिण्याच्या पाणी योजना व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा, यामुळे मुळा धरण दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायीनी ठरले आहे. 

हेही वाचा - खासदार विखे पाटलांनी पुन्हा मारला पवारांना टोमणा

2018मध्ये मुळा धरण भरले नव्हते. तिव्र दुष्काळामुळे दीड वर्ष लाभक्षेत्रातील पिके सिंचनाअभावी होरपळली. मागील वर्षी लाभक्षेत्रात कमी पाऊस झाला. परंतु, पाणलोटात तुफानी पाऊस झाला. त्यामुळे सिंचनाची चार आवर्तने झाली. दुष्काळाच्या झळा कमी झाल्या. यावर्षी आजपर्यंत लाभक्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. भूगर्भातील पाणीपातळी वाढली. विहिरी व कूपनलिका तुडुंब आहेत.

यंदा जायकवाडीला पाणी सोडावे लागले नाही, तर धरण भरल्यावर लाभक्षेत्रातील दुष्काळ हटणार आहे. धरणातून खरीप हंगामाचे सिंचनाचे आवर्तन एक जुलै ते 14 ऑक्‍टोबरदरम्यान होते. परंतु, यंदा खरिपाच्या आवर्तनाची गरज भासणार नाही, अशी परिस्थिती आहे. 15 ऑक्‍टोबर ते 28 फेब्रुवारीदरम्यान रब्बी हंगामात सिंचनाचे एक आवर्तन होईल. एक मार्च ते 30 जूनदरम्यान उन्हाळी हंगामात दोन आवर्तने होतील, अशी शक्‍यता आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top