खासदार विखे पाटलांचा पवार कुटुंबाला पुन्हा टोमणा, मी चुकलो तरी आजोबांनी कधीच असं झापलं नाही

Pawar-Vikhe family likely to quarrel again
Pawar-Vikhe family likely to quarrel again

नगर ः आजोबा शरद पवार यांनी जाहीरपणे नातू पार्थ पवार याचे कान टोचल्यामुळे उडालेला राजकीय धुराळा खाली बसायला तयार नाही. राजकीय विश्लेषकांपासून विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत हाच विषय चर्चिलात आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने अन्वयार्थ काढीत आहेत. काही आडमार्गाने तीर मारीत आहेत. सोशल मीडियातही याचे पडसाद उमटत आहेत. विखे पाटील यांनीही आपल्या परीने आडमार्गाने का होईना टोला लगावला आहे.

पवार आणि विखे पाटील ही घराणी राजकारणात धुरंधर मानली जातात. या दोन्ही कुटुंबात तीन पिढ्यांपासून राजकीय वितुष्ट आहे. पंधराच दिवसांपूर्वी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या दोन्ही घराण्यातील वादावर भाष्य केले होते. आमच्यात भांडण लावून लोकांनी गाडी-बंगले कमावले. आपली पोळी भाजण्यासाठी आमच्यात कसे भांडण पेटत राहील हेच पाहिले, असे डॉ. विखे पाटील यांचे म्हणणे होेते.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही राजकीय वादाबाबत समेट घडवण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. परंतु आमच्या घराण्यातील आजोबा (शरद पवार) किंवा इतर ज्येष्ठावर आरोप किंवा टीका केल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला होता.

पार्थच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे, असे जाहीर भाष्य करून आपल्या नातवाला झापले होते. त्यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना याबाबत विचारले असता ते ""माझ्या आजोबांनी मला कायम पाठबळ दिले. कधी माझी चूक असली, तरी समर्थन केले. समज देण्याची वेळ आली, तर एकांतात दिली. आता पार्थ पवारच्या बाबतीत काय झाले, ते मी कसे सांगणार? राष्ट्रवादीचे नेते याबाबत सांगू शकतील. तो त्यांच्या पक्षातील मामला आहे.'' 

एकंदरीत सुजय विखे पाटील यांनी मला आजोबांचे प्रत्येक गोष्टीत समर्थन असल्याचे सांगून पवार घराण्यातील वादाबाबत टोमणा मारला आहे. या वादावर पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यावर कसे उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com