आम्ही निधी आणतो; विराेधक पाठ थोपटून घेत असल्‍याची आमदार राजळे यांची टीका

We bring in funds Criticism of MLA Rajale for opposing the opposition
We bring in funds Criticism of MLA Rajale for opposing the oppositionsakal

पाथर्डी : पाठपुरावा करून आपण विविध योजनांसाठी निधी आणतो. मात्र, निधी प्राप्त झाल्याचे समजताच आपले विरोधक, ‘राज्यात महाआघाडी सरकार आहे. हा निधी आम्ही आणला,’ असे म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याची टीका आमदार मोनिका राजळे यांनी प्रताप ढाकणे यांचा नामोल्लेख टाळून केली.

We bring in funds Criticism of MLA Rajale for opposing the opposition
अहमदनगर : अण्णांचे शहांना पत्र; २५ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

राजळे म्हणाल्या, की अतिवृष्टीत अनेक गावांतील बंधारे वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. मात्र, या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी आणण्याचे काम आपण करीत आहोत. पंकजा मुंडे ग्रामविकासमंत्री असताना त्यांनी तालुक्याला जलयुक्त शिवार योजनेसाठी मोठा निधी देऊन ठाकरे सचिवालय योजना आणली.

We bring in funds Criticism of MLA Rajale for opposing the opposition
अधिकाऱ्यांना चार तास कोंडले; वीजबिलावरून देवळालीचे शेतकरी आक्रमक

या योजनेमुळे आता प्रत्येक गावात ग्रामपंचायतीची चांगली इमारत उभी राहणार आहे. अतिवृष्टीमुळे ज्या बंधाऱ्यांचे नुकसान झाले, त्याचे पंचनामे आपण करून घेतले. लवकरच बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळणार आहे. गेली पाच वर्षे तुमच्या विश्वासाला पात्र राहीन अशा पद्धतीने आपण काम केले आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होणार आहेत, त्यात विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही राजळे यांनी केले. प्रास्ताविक ॲड. हरिहर गर्जे यांनी केले. आभार चंद्रकांत पाचरणे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com