अधिकाऱ्यांना चार तास कोंडले; वीजबिलावरून देवळालीचे शेतकरी आक्रमक

वीजबिल वसुलीविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला आतून कुलूप
Officers detained for four hours Deolali farmers aggressive on electricity bill
Officers detained for four hours Deolali farmers aggressive on electricity bill sakal

राहुरी : देवळाली प्रवरा येथे आज (सोमवारी) सक्तीच्या वीजबिल वसुलीविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला आतून कुलूप ठोकले. तब्बल चार तास अधिकाऱ्यांना कोंडले. अकरा गावांमध्ये आठ दिवसांपासून बंद असलेली ३१६ रोहित्रे सुरू केल्याशिवाय कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.(farmers aggressive on electricity bill)

Officers detained for four hours Deolali farmers aggressive on electricity bill
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतले सोनिया, प्रियांका स्टार प्रचारक

गेल्या वर्षातील थकीत तीन वीजबिले भरून रोहित्र सुरू करण्याचा तोडगा निघाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. देवळाली प्रवरा महावितरण उपविभागाअंतर्गत २३७२ कृषी रोहित्रे आहेत. त्यांपैकी देवळाली प्रवरा, आंबी, दवणगाव, टाकळीमियाँ, आरडगाव, त्रिंबकपूर, शिलेगाव, कोल्हार, ताहाराबाद, कणगर, म्हैसगाव या ठिकाणची ३१६ रोहित्रे थकीत वीजबिल वसुलीसाठी आठ दिवसांपूर्वी बंद केली आहेत.

जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल सुरू झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आज (सोमवारी) सकाळी अकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेतकरी प्रशांत कराळे, गौतम कोळसे, नानासाहेब कोळसे, राजेंद्र आढाव, महेश कोळसे, संतोष मुसमाडे, रवींद्र टिक्कल, आदिनाथ कोळसे, राजेंद्र शेळके, गणेश बडाख, केशव शेळके यांनी भाग घेतला.

Officers detained for four hours Deolali farmers aggressive on electricity bill
‘अंनिस’च्या राज्य अध्यक्षपदी सरोज पाटील

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले. दुपारी अडीच वाजता पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली; मात्र तोडगा निघाला नाही. गुन्हा दाखल झाला तरीही मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. उपकार्यकारी अभियंता देहरकर यांनी, महावितरणची आर्थिक परिस्थिती, संभाव्य खासगीकरणाचे धोके, सधन भागातील शेतकऱ्यांकडून वीजबिलाची अपेक्षा, याविषयी आंदोलकांशी चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com