

Minister Radhakrishna Vikhe Patil’s witty response “What’s in your mind is in mine too” sparks political chatter across Maharashtra.
Sakal
-सुहास वैद्य
कोल्हार: सामाजिक कार्यकर्ते अशोक आसावा यांनी कोल्हार - बेलापूर रस्त्यावर एक-दीड किलोमीटरपर्यंत दुभाजक व रस्त्याचे सुशोभीकरण करण्याबाबत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधले. विखे यांनी त्याची दखल घेतली. ‘जे तुमच्या मनात ते माझ्याही मनात आहेच,’ असा बोलकेपणे प्रतिसाद त्यांनी दिला. निमित्त एका उद्घाटन कार्यक्रमाचे. त्यानिमित्ताने दोघेही एकाच व्यासपीठावर होते. एकमेकांशी हितगुज करताना विखे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीच्या व उद्योग व्यवसायाच्या नुकसानीविषयी चिंता व्यक्त केली.