डरने का नही, राजळे-गडाख कुटुंबाने शिकवलं

विनायक दरंदले
Saturday, 24 October 2020

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना राजकीय घरण्यातील म्हणून बडेजाव न करता वर्ग मैत्रिणीसह गावभर फिरुन शेण गोळा करत वर्ग सारुन घेतलेला आहे. आयुष्यातील संस्काराची खरी जडणघडण प्राथमिक शाळेतून झाली.

सोनई : वडील अप्पासाहेब राजळे व सासरे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी नेहमीच 'मैं हूँ ना...' म्हणत पाठिराखे राहिल्याने आयुष्यात खूप संकटे येवूनही, डरनेका नही.. असे समजून संकटाचा सामना केला. स्वभावच लढवय्या झाल्याने आता संकटाची अजिबात भीती वाटत नाही, असे प्रतिपादन माजी पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांनी व्यक्त केले.

किडस किंग्डम विद्यालयाच्या वतीने आयोजित "नवदुर्गा २०२०" या ऑनलाईन प्रश्नमंजुशा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या नऊ
महिलांची नवदुर्गासाठी निवड करण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्या कीर्ती सचिन बंग यांनी स्वागत केले. शिक्षिका पल्लवी बेल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले तर इयत्ता आठवीतील सिध्दी बाबासाहेब कल्हापुरेने गडाख यांची मुलाखत घेतली.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना राजकीय घरण्यातील म्हणून बडेजाव न करता वर्ग मैत्रिणीसह गावभर फिरुन शेण गोळा करत वर्ग सारुन
घेतलेला आहे. आयुष्यातील संस्काराची खरी जडणघडण प्राथमिक शाळेतून झाली.

वडील अप्पासाहेब, सासरे गडाख साहेब व मामा मंत्री बाळासाहेब हे माझे आदर्श आहेत.पती शंकरराव व दीर प्रशांत पाटील यांची समाजकारणाची धडपड जवळून पाहिल्याने आपणही समाजाचं देणं आहोत, ही भावना मनात रुजली, असे त्यांनी सांगितले.

यश गुगळे या बालकाचं अपहरण असो किंवा गावावर आलेल्या वेगवेगळ्या संकट समयी सर्व गाव व सर्व समाज एक होत मदतीसाठी धावून येतात म्हणून
मला सोनईकर असल्याचा अभिमान आहे, असे सांगून गडाख यांनी 'कोरोना' च्या लाॅकडाऊन मध्ये खुप पुस्तके वाचली आणि खरंच त्यातून खुप शिकण्यास
मिळाले. आरोग्य, कुटुंब,करीयर व समाज हा चौकोन यशाचा गुरुमंत्र आहे.असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why not fear, Rajale-Gadakh family taught