
श्रीरामपूर : दारू पिण्यास ट्रॅक्टर घेऊन जाण्यास विरोध केला असता, पतीने पत्नीच्या अंगावरून ट्रॅक्टर घालून तिला ठार मारले. कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथे बुधवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.