Deepak Kesarkar: कोकणात वाहून जाणारे पाणी नगरला मिळणार? मंत्री दीपक केसरकरांच आश्वासन

विखे परिवाराची जनतेच्या प्रश्‍नांवर नेहमीच संघर्षाची भूमिका
Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal

शिर्डी: माजी खासदार (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्‍ट्र पाणी परिषदेच्‍या माध्‍यमातून, कोकणात वाहून जाणारे पाणी नगर, नाशिक आणि मराठवाड्यातील दुष्‍काळी भागाला मिळवून देण्‍याची योजना सरकारला सादर केली होती.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ती प्रत्यक्षात आणणार आहेत. राजकारण सर्वच करतात, मात्र विखे परिवाराने सातत्याने संघर्षाला तोंड देत जनतेच्‍या प्रेमात राहणे पसंत केले, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा ४३ वा स्‍मृतिदिन आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९१ व्‍या जयंतीचे औचित्‍य साधून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी लोणी खुर्द येथे बीओटी तत्त्वावर बांधण्‍यात आलेल्‍या जिल्‍हा परिषद शाळा इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि लोणी बुद्रुक येथील व्‍यापारी संकुलाचे उद्‍घाटन त्‍यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

Deepak Kesarkar
Crime News: धक्कादायक! जन्मदात्या पित्याने २१ वर्षीय मुलाची गळा आवळून केली हत्या

अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के होते. यावेळी उद्धव महाराज मंडलिक, महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकुटे, जिल्‍हाधिकारी सिद्धा‍राम सालीमठ, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भाऊसाहेब विखे,

प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्ष शालिनी विखे पाटील, जिल्‍हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ आदी उपस्थित होते. मोफत अपघात विमा योजनेतून सात कुटुंबांना विमारकमेचे धनादेश वितरित करण्यात आले.

Deepak Kesarkar
श्रीरामपुरच्या राजकारणाचा ठाव लागेना; विखेंसोबत युती अन् थोरातांकडून सत्कार, काय आहे प्रकरण

केसरकर म्‍हणाले, की डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व माजी खासदार (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले. तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले. शालेय शिक्षणात कृषी अ‍भ्‍यासक्रमाचा समावेशही करण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला. शेती क्षेत्रात असलेले महत्त्व, शेतकऱ्यांचे दु:ख हे नव्‍या पिढीलाही समजले पाहिजे, हाच दृष्टिकोन यामागे आहे.

मंत्री विखे पाटील यांनी, लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून जोपासलेला आध्यात्मिक वारसा म्‍हणजे पद्मश्री विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या संस्‍कारांचा भाग आहे, असे सांगितले. माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, खासदार डॉ. विखे पाटील यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com