
गडाखांचा पायंडा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर मंडळाच्या विजयी १६ सदस्यांनी आपआपल्या प्रभागात जाऊन पराभूत उमेदवारांची भेट घेवून आभार मानले.
सोनई (अहमदनगर) : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार राग, द्वेष आणि सुडबुध्दीने झाला असला तरी विजयानंतर झालं गेलं विसरुन जगदंब मंडळाच्या विजयी उमेदवारांनी पराभूत उमेदवारांची भेट घेत आभार मानले आहेत. हे वेगळेपण ग्रामस्थांना चांगलेच भावले आहे.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी फार पुर्वीपासून ही परंपरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात रुजवलेली आहे. साखर कारखाना, सेवा संस्था, ग्रामपंचायत व इतर निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवार पराभूत उमेदवार व प्रमुख जेष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेवून आभार मानतात. बिनविरोध सदस्य अर्ज माघारी घेणा-यांना भेटून आभार मानत आलेले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
गडाखांचा पायंडा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर मंडळाच्या विजयी १६ सदस्यांनी आपआपल्या प्रभागात जाऊन पराभूत उमेदवारांची भेट घेवून आभार मानले. विकास कामांबाबत आपल्या सुचनेस अग्रक्रम देवू असे सांगितले. प्रभाग तीनमधील उमेदवार सविता अंबादास राऊत यांनी पराभूत उमेदवार अनिता खेसमाळसकर यांना पेढा भरुन स्वागत केले. श्वेताली दरंदले, सुरेखा पवार, विद्या दरंदले व इतर सदस्यांनी हा उपक्रम आपल्या प्रभागात राबविला.
लोकशाहीचा आदर म्हणून आमच्या ग्रामविकास मंडळाने सर्व जागा लढल्या. आमचा एक उमेदवार विजयी झाला. काहींचा थोड्या मताने पराभव झाला. हा पराभव स्विकारत आम्ही सुध्दा कुठलाच राग द्वेष ठेवला नाही.
- प्रकाश शेटे, ग्रामविकास मंडळ प्रमुख