
अहिल्यानगर : नगर शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस अंमलदाराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना रविवारी (ता.८) सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. जयश्री हरिश्चंद्र सुद्रिक असे या महिला पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.