Scene from Arangaon where a woman walking along the highway died in a sudden road accident.
sakal
अहिल्यानगर : अहिल्यानगर-दौंड महामार्गावर अरणगाव (ता. नगर) शिवारात हॉटेल समाधानजवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाविरुद्ध ३० नोव्हेंबर रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीराबाई भानुदास शिंदे (रा. डिग्रस, ता. राहुरी) असे मृत महिलेचे नाव आहे. राजेश भानुदास शिंदे (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे.