esakal | कोपीची तर उंची कमी, मग महिलेनी गळफास घेतला कसा; पोलिसांनी व्यक्त केलाय संशय
sakal

बोलून बातमी शोधा

Woman Yashodha Kashinath Madhe suicide at Gadilgaon in Parner taluka

गाडीलगाव येथील खानेबावस्ती येथे यशोधा काशिनाथ मधे (वय31) या महिलेने राहत असलेल्या कोपीत बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

कोपीची तर उंची कमी, मग महिलेनी गळफास घेतला कसा; पोलिसांनी व्यक्त केलाय संशय

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : गाडीलगाव येथील खानेबावस्ती येथे यशोधा काशिनाथ मधे (वय31) या महिलेने राहत असलेल्या कोपीत बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 18 ) रात्री सहा ते आठ वाजणेच्या सुमारास घडली असावी असा आंदाज आहे. या बाबत पारनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, यशोदा काशिनाथ मधे (मूळ रा. वारणवाडी, टाकळी ढोकेश्वर) ही महिला हल्ली मजूरीच्या कामानिमित्ताने गाडीलगाव येथील खानेबावस्ती येथे वनविभागाच्या जागेच्या शेजारी रहात होती. तिने रात्री सहा ते आठ वाजणेच्या दरम्यान आपल्या राहात्या कोपीत निळे रंगाचे स्कार्पने कोपीच्या बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात भाऊसाहेब यादव मधे (मूळ रा.  वारणवाडी टाकळी ढोकेश्वर)  हल्ली राहणार गाडीलगाव (खानेबावस्ती) याने खबर दिली आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली निघोज पोलिस करत आहेत.

कोपीची ऊंची कमी असूनही गळफास लावून आत्महत्या कशी केली. याबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याबाबत पोलिस शोध घेत आहेत. या महिलेने आत्महत्या केली त्या परीसरात काही अवैध धंदे चालतात, अशी माहीती आहे. मागील आठवड्यातच पठारवाडी येथे एका आदिवाशी तरूणाने आत्महत्या केली होती. आता पुन्हा ही दुसरी आत्महत्या आहे.

संपादन : अशोक मुरुमकर