
टाकळी ढोकेश्वर: पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्यात विकासकामांना गती मिळत आहे. शेतकरी, युवक आणि महिलांच्या कल्याणासाठी पक्ष कटिबद्ध आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन पक्षाची धोरणे लोकांपर्यंत पोहोचवावीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे निर्देश आमदार काशिनाथ दाते यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिले.