esakal | जिल्हा परिषदेचे बांधकाम, सहा महिने थांब

बोलून बातमी शोधा

The work was delayed by the construction department of the Zilla Parishad}

नगर जिल्हा परिषदेचा कारभारच असा आहे.

जिल्हा परिषदेचे बांधकाम, सहा महिने थांब
sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : ः "जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे काम म्हणजे गंमतीशीर प्रकार आहे. या विभागाविषयी अनेक वदंता आहेत. बांधकामचे काम अन्‌ बारा महिने थांब या म्हणीप्रमाणेच काम सुरू आहे. या कामावरून जिल्हा परिषदेच्या सभेत अनेकदा सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, कामात सुधारणा झाली नाही. याची प्रचिती जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसह डोंगरगण (ता. नगर) येथील कामाच्या देखभाल- दुरुस्तीच्या कामात जिल्हावासीयांना आली. 

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी विशेष लक्ष दिले. त्यानंतर या कामासाठी निधी मिळण्याकरिता तत्कालीन कार्यकारी अभियंता दत्तात्रेय गावडे यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला. त्यामुळे जुन्या इमारतीसाठी 48 लाखांचा व डोंगरगण येथील विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठी 20 लाखांच्या कामाला ऑगस्ट 2020मध्ये बांधकाम विभागाकडून जॉब क्रमांक देण्यात आला. त्यानंतर तातडीने कामाची तांत्रिक मंजुरी व निविदाप्रक्रिया होणे गरजेचे असताना, कामात दिरंगाई झाली. सहा महिन्यांनंतर निविदाप्रक्रिया करून कामांचे वाटप झाले.

हेही वाचा - जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी-काँग्रेसचाच झेंडा

दरम्यान, या प्रकरणी अनेकांनी बांधकाम विभागाकडे माहिती मागितली असता, ती देण्यास संबंधितांकडून चालढकल केली जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

कामांची तारीखनिहाय स्थिती 
जिल्हा परिषदेची जुनी इमारत व डोंगरगण (ता. नगर) येथील विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठी बांधकामच्या अधीक्षक अभियंत्यांकडून ऑगस्ट 2020मध्ये मंजुरी. दोन्ही विषय स्थायी समितीसमोर 23 ऑक्‍टोबरला सादर. एक फेब्रुवारीला या कामांना तांत्रिक मंजुरी. डोंगरगणच्या कामाची 30 फेब्रुवारीला निविदाप्रक्रिया. एक ते सात फेब्रुवारीपर्यंत निविदा स्वीकारल्या. दोनच निविदा आल्याने 12 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. तीन मार्चला तांत्रिक मंजुरी. 18 फेब्रुवारीला आर्थिक मंजुरी. तीन फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची निविदाप्रक्रिया. चार ते 12 फेब्रुवारीपर्यंत मुदत निविदेला 17 फेब्रुवारी रोजी तांत्रिक मंजुरी. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसह डोंगरगणच्या विश्रामगृहाच्या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या कामाला सुरवात होईल, असे सभापती काशीनाथ दाते यांनी सांगितले. 

सदस्य अनभिज्ञ 
जुन्या इमारतीसह डोंगरगण येथील विश्रामगृहाच्या देखभाल- दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला, तरी त्यात काय कामे होणार आहेत, याविषयी सदस्यांसह काही पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. तसेच, या कामासाठी आर्किटेक्‍ट नियुक्त करणे गरजेचे असतानाही प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. अहमदनगर