
हजारे यांच्या माध्यामातून देशालाच नव्हे तर जगाला जलसंधारणाचे महत्व समजले आहे. त्यांच्या आंदोलनाच्या माध्यामातून भारतीय जनतेला माहिती अधिकारासह दफ्तर दिरंगाईसारखे अनेक उपयुक्त असे कायदे मिळाले आहेत. त्यामुळे राळेगणसिद्धी हे विविध विषयावरील ज्ञान व माहिती देणारे माहिती पीठ व देशातील एक उत्कृष्ट असे पर्यटनस्थळ बनले आहे.
पारनेर ः लॉकडाऊनच्या काळातही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ऑनलाईन परीसंवादाच्या माध्यामातून देशातीलच नव्हे तर थेट देशाबाहेरील जनतेबरोबर तसेच आपल्या कार्यकर्त्यांशी विविध विषयावर संवाद साधला. सारे जग लॉकडाऊनमध्ये बंदीस्त झाले असताना हजारे यांनी आपल्या दहा बाय दहाच्या खोलीतूनही देशातील व जगातील जनतेशी संवाद साधत आहेत.
हजारे यांच्या माध्यामातून देशालाच नव्हे तर जगाला जलसंधारणाचे महत्व समजले आहे. त्यांच्या आंदोलनाच्या माध्यामातून भारतीय जनतेला माहिती अधिकारासह दफ्तर दिरंगाईसारखे अनेक उपयुक्त असे कायदे मिळाले आहेत. त्यामुळे राळेगणसिद्धी हे विविध विषयावरील ज्ञान व माहिती देणारे माहिती पीठ व देशातील एक उत्कृष्ट असे पर्यटनस्थळ बनले आहे.
हजारे यांनी लॉकडाऊनच्या काळात देशभरातील विविध राज्यात व देशाबाहेरही सुमारे 12 ठिकाणी ऑनलाईन परिसंवादात घेतले आहेत. त्यातील एक परिसंवाद ऑस्टेलियामधील विद्यापीठात झाला आहे. देशात व राज्यात मार्च माहिण्यात लॉकडाऊन जाहीर झाले.
राळेगणसिद्धी येथेही 22 मार्चला ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन लॉकडाऊन जाहीर केले. गावाबाहेरील पर्यटकांना गावात कोरोना चा प्रसार होऊ नये यासाठी कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होई पर्यंत गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गेली 13 वर्षात राळेगणसिद्धी गावाला सुमारे नऊ लाखाहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. मात्र कोरोनामुळे गेली सात महिणे गाव पर्यटकांविना सुने सुने झाले आहे. येथे येणा-या पर्यटकांनी राळेगणसिद्धीचा परीसर पाहण्याबरोबरच हजारे यांचे मार्गदर्शनही घेतले. हजारे यांनी गेली 13 वर्षात देशातील अनेक राज्यात व देशाबाहेबरही जाऊन पाणलोटविकासाचे मार्गदर्शन केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात हजारे यांनी परदेशातील ऑस्टेलिया मधील ऑस्टेलिया युनिर्व्हसिटी मधील मुलांसमावेत ग्राविकास या विषयावर सुमारे दीड तासाहून अधिक काळ संवाद साधला आहे. तसेच मुंबईच्या गुरूकुल विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी आण्णांचे जीवनकार्य व प्रेरणा या विषयावर परिसंवादात झाला.
नवी दिल्लीच्या राष्ट्रीय युथ पार्लमेंट, राज्यस्थानमधील गोरखपूरच्या कार्यकर्त्यांशी, त्याच बरोबर छतपूर (मध्यप्रदेश), पुण्याच्या स्वीमी विवेकानंद केंद्र,आदर्शगाव पिंपलांत्री (राज्यस्थान), अमरावती महाविद्यालय, देशभरातील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालये आदी ठिकाणी झालेल्या परीसंवादातून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच योगा दिनानिमित्ताने माधवबाग येथे योगा दिनाचे उदघाटन व मार्गदन हजारे यांनी याच काळात केले होते.
महिन्याकाठी 20 हजाराहून अधिक किलोमिटरचा प्रवास करणारे हजारे यांचा प्रवास गेली आठ महिने थांबला असला व लॉकडाऊनमुळे हजारे यांचा मुक्काम राळेगणसिद्धीतच असला तरीही त्यांचे मार्गदर्शन व परीसंवाद सुरूच आहे.
कोरोनाच्या काळात पोलीस दल एकही दिवसाची सुट्टी न घेता 24 तास काम करत आहे. याही स्थीतीत हजारे यांच्या मार्गदर्शनासाठी छतरपूरच्या पोलीस अधिक्षकांनी एक अगळावेगळा उपक्रम राबविला आहे. तेथील गावांगावामध्ये कर्मचा-यांनी स्वयंसेवक म्हणून जाऊन त्या गावातील वयोवृद्ध तसेच निराधार कुटुंबांचा शोध घेतला व त्यांना औषधांसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला या उपक्रमाचे संपुर्ण मध्यप्रदेशात कौतुक होत आहे.
संपादन - अशोक निंबाळकर