

Child Prodigy Turns Ideas into Books with Parents’ Support
Sakal
कोपरगाव : शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी अद्या काळे हिने विविध विषयांवरील चार पुस्तके प्रकाशित केली. बाल विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या या प्रत्येक पुस्तकाच्या लेखनामागील कहाणी ती व्यासपीठावरून अस्सलिखीत इंग्रजी भाषेत कथन करते. तिची धाकटी बहीण अनया चार वर्षांची असताना हातातल्या बाहुलीला गोष्ट सांगत असे. त्यातून तिला लेखनाची प्रेरणा मिळाली. संजीवनी ग्रुप आॅफ स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रोत्साहन दिल्याने मी लेखन प्रवास सुरू केला, अशी प्रतिक्रिया तिने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.