
-राजू नरवडे
संगमनेर: शिक्षण घेतल्यानंतर बहुतांश तरुण नोकरीच्या मागे धाव घेतात, पण तालुक्यातील सावरगाव तळ येथील मंगेश नारायण गाडे या तरुणाने मात्र वेगळा निर्णय घेतला. कृषी शाखेत पदवीधर (बीएस्सी अॅग्री) असलेल्या या तरुणाने नोकरीच्या ऐवजी शेतीला प्राधान्य दिले. पाच एकर क्षेत्रावर लावलेल्या टोमॅटो पिकातून आत्तापर्यंत तब्बल चाळीस लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. अजून दहा ते पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न होणार असल्याचे त्याने सांगितले.