

Rashin Mourns Young Man Killed in Hoarding Fall During Heavy Winds
sakal
राशीन : जोराच्या वाऱ्यात लोखंडी होर्डिंगवरून खाली पडून अमित मोहन सुकाळे (वय २४, रा. राशीन, ता. कर्जत) या तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी महात्मा फुले चौकात ही घटना घडली. रविवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान राशीनसह परिसरात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली.