Shivam Bohar, a young man from Pimpalwadi, tragically drowned in the village lake; police and locals conduct recovery operations.Sakal
अहिल्यानगर
Drowning Death: 'पिंपळवाडीतील तळ्यात बुडून युवकाचा मृत्यू'; शिवम बाेहर फिरायला गेला अन् परतलाच नाही, नेमकं काय घडलं
Tragedy in Pimpalwadi: शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे व राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या सूचनेवरून शिर्डी व राहाता येथील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पिंपळवाडी ग्रामपंचायत तळ्यामध्ये पडलेल्या शिवम् दळवीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
शिर्डी: शिवम गणेश दळवी (वय २०) याचा पिंपळवाडी येथील तळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.१९) घडली. येथील साई आश्रया अनाथाश्रमाचे चालक गणेश दळवी यांचा तो मुलगा आहे. शिर्डीजवळ पिंपळवाडी ग्रामपंचायतीचा पाणी साठवण तलाव आहे. नेहमीप्रमाणे शिवम तेथे फिरायला गेला.