Ahilyanagar Accident: 'अवजड वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू'; हायवा डंपरखाली तरुण सापडला, गुन्हा दाखल

Fatal Hit by Heavy Vehicle: धडकेत तो डंपरच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला. त्याच वेळी दिल्लीगेट परिसरात असलेले त्याचे नातेवाईक राजकिरण कुमार पटेकर (रा. गौतमनगर, नीलक्रांती चौक) यांनी त्यास उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
Scene of the tragic accident where a Hyva dumper fatally crushed a young man.
Scene of the tragic accident where a Hyva dumper fatally crushed a young man.Sakal
Updated on

अहिल्यानगर : शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या दिल्लीगेट परिसरात खडी, मुरूम वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरखाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.१६) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. प्रकाश नाना अवचर (वय ३२, रा. दातरंगे मळा, नालेगाव) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com