
अकोले : राजूरमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून काविळीच्या रुग्णांत वाढ झालेली आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना काविळीने ग्रासलेले आहेत. काविळीने प्रियांका हरिदास शेंडे (वय २०) या युवतीवर संगमनेर येथे उपचार सुरु असताना मृत्यू झालेला आहे. ही घटना रविवार (ता. २७) रोजी घडली आहे.