कोरोनाचे संकट, त्यात बोगस बियाणे अशा स्थितीतही तरुणानी जोपासली भात शेती

शांताराम काळे
Tuesday, 27 October 2020

कोरोनाचे संकट, त्यात बोगस बियाणे व अवकाळी पाऊस अशी स्थिती असताना पाडाळणे येथील तरुण शेतकरी आपले भातपीक व पारंपरिक पद्धतीने जपलेली बियाणे, चारसूत्री पद्धतीने लागवड करत असल्याने त्याची शेती पाहण्यासाठी शेतकरी, कृषी अधिकारी भेट देऊन त्याने जोपासलेली शेतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अकोले (अहमदनगर) : कोरोनाचे संकट, त्यात बोगस बियाणे व अवकाळी पाऊस अशी स्थिती असताना पाडाळणे येथील तरुण शेतकरी आपले भातपीक व पारंपरिक पद्धतीने जपलेली बियाणे, चारसूत्री पद्धतीने लागवड करत असल्याने त्याची शेती पाहण्यासाठी शेतकरी, कृषी अधिकारी भेट देऊन त्याने जोपासलेली शेतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सध्या त्यांच्या शेतात इंद्रायणी, काळ भात, दप्तरी, १००८ या जातीचे भातपीक जोमात आले आहे. ऊस शेतीचे बियाणे आणून तो लागवड करणार असल्याने भागातील शेतकरी त्याच्या या नवनवीन शेती पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या शेतावर भेट देऊन आपल्या शेतात असा प्रयोग राबवता येईल का? याची चाचपणी करताना दिसत आहे. इंद्रायणी या भाताची लागवड करताना स्वतः तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी गाळात उतरून लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविले.

राम तळेकर हे कृषी व्यावसायिक आहेत. स्वतः च्या शेतामध्ये प्रयोग करून इतर शेतकऱ्यांना शेतीचे  आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पाहचविण्याचे काम करत आहेत. तालुका तसेच तालुक्याबाहेरील शेतकरी येऊन त्यांच्या भात पिकाची पाहणी करत आहेत. राजूर : कधी वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेत वारकरी, कीर्तनकार यांची सेवा, तर सातत्याने आर्थिकदृष्टया पीडित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता मदत मिळवून देणे अशी कामे अविरतपणे सुरु ठेवत सामाजिक बांधिलकी पाळत आपल्या आयुष्याच्या ४५ वर्षात आतापर्यंत तब्बल १३० वेळा वेळोवेळी रक्तदान करणारा पाडाळणे येथील राम तळेकर तरुणाई पुढे एक आदर्श घालून देत आहे.

संप्रदायाचा वारसा लाभलेले अकोले तालुक्यातील पाडाळणे या एक खेडे. विविध जाती धर्माचे लोक येथे गुण्या गोविंदाने नांदत आहेत. याच गावातील राम तळेकर यांना बालवयातच सामाजिक कार्याची गोडी लागली.

आपल्या गावातील महिलेला रक्ताची गरज असताना वयाच्या सोळाव्या वर्षी केलेल्या पहिल्या रक्तदानाने सामाजिक बांधिलकी मी शिकल्याचे तळेकर यांनी सांगितले. रक्ताची निकड लक्षात घेत यानंतर जिथे रक्तदान शिबीर असेल तेथे जात गेलो आणि रक्तदान करत राहिलो. आजपर्यंत आपण १३० वेळा रक्तदान केल्याचे ते अभिमानाने सांगतात. 

गावातील आदिवासी समाजातील एका वयोवृद्ध निराधार महिलेस तहयात तिला दोन वेळचे जेवण देत गेलो. माणसातील देव दिसला. ही आजी गेली आणि आता गावातीलच दुसऱ्या एका निराधार व्यकतीला दोन वेळचे जेवण देत आपला वसा त्यांनी कायम ठेवला.

संप्रदायाची आवड असणाऱ्या गावातील दोन मुलींना आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देत त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली. या दोन्ही मुली भगवी पताका खांद्यावर घेत गावोगावी कीर्तन सेवेतून समाज प्रबोधनाचे काम करत आहे. तर गावातीलच एका मुलीस पुणे येथे उच्च शिक्षणासाठी मदत मिळवून दिली.

ती आज अमेरिकेत नोकरी करीत आहे याच्यासारख्या दुसरा आनंद कोणता हे तळेकर आवर्जून सांगतात. गावातील मुलांना कधी कपडे तर कधी वह्या वाटप करणे, तालुक्यातीलच एका कीर्तनकारास दरवर्शी मदत करतात. शेतीच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करून परिसरातील गरीब शेतकऱ्यांना बियाणे, खते देऊन त्याना खऱ्या अर्थाने ते मदत करतात. उसाची नव्याने विकसित झालेली बियाणे पद्धत ते राबवत असून त्यासाठी त्यांनी सांगली, कोल्हापूर येथे अभ्यास दौरा केला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth from Akole taluka also farmed in the crisis of Corona