
अहिल्यानगर : एमआयडीसी परिसरातील नागापूर येथील डोंगरे कॉम्प्लेक्सजवळ प्राईम मेडिकल येथून पायी जाणाऱ्या तरुणाला दोघांनी अडवून शिवीगाळ करत धारदार हत्याराने वार कनून जखमी केले. तसेच त्याच्या खिशातील एक हजार ९०० रुपये बळजबरीने काढून घेतल्याची घटना ७ जुलै रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली.