esakal | जळीत झालेल्या उसतोडणी कामगारांना उदयन गडाखांनी केली तातडीची मदत

बोलून बातमी शोधा

sonai

मंगळवार (ता.२१) रोजी सकाळी गट परिसरातील दोन झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.

जळीत झालेल्या उसतोडणी कामगारांना उदयन गडाखांनी केली तातडीची मदत
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सोनई (अहमदनगर) : मुळा कारखाना गट परिसरात उसतोडणी कामगारांच्या दोन झोपड्या जळून खाक झाल्यानंतर नुकसानग्रस्त कुटुंबास युवानेते उदयन गडाख यांच्या वतीने मदतीचा हातभार लावण्यात आला.

मंगळवार (ता.२१) रोजी सकाळी गट परिसरातील दोन झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये दोन मोटारसायकल सह धान्य, कपडे व संसारोपयोगी साहित्य जळाले होते. दोन्ही कुटुंब उघड्यावर पडले असताना गडाख यांनी तातडीने रमेश देशमुख यांच्याकडे साडीचोळी, कपडे व आवश्यक किराणा साहित्य प्राथमिक गरज म्हणून तातडीने दिले. उसतोडणी कामगार हिराजी गंगाधर जगदाळे व सतीष महादेव मोरे यांना पाठविलेल्या मदतीचे वाटप करण्यात आले.

यावेळी उद्योजक गोरख दरंदले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कुसळकर, व्यावसायिक नागेश गर्जे, भास्कर कांबळे उपस्थित होते. या मदतीचे उसतोडणी मुकादम व कामगारांनी स्वागत केले आहे.