फक्त नारळ फोडत बसणार नाही : उदयन गडाख

Youth leader Udayan Gadakh has criticized that only sweet words do not solve problems.jpg
Youth leader Udayan Gadakh has criticized that only sweet words do not solve problems.jpg
Updated on

सोनई (अहमदनगर) : मागील आमदाराने तालुक्यात काम कमी व नारळ फोडण्याचाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला. फक्त गोड बोलून प्रश्न सुटत नसतात, अशी टीका युवानेते उदयन गडाख यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव न घेता केली. 

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या निधीतून झालेल्या कन्हेरवस्ती, नवनाथनगर, बेल्हेकरवाडी, हनुमानवाडी व मुळा गट परिसरातील रस्त्यांचे उदघाटन झाल्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमास सोनईचे सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हारकाळे, माजी सरपंच राजेंद्र बोरुडेसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

मुळागट परिसरात झालेल्या रस्ता उदघाटन कार्यक्रमात शनैश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त एकनाथ दरंदले, गोरख दरंदले यांचे भाषण झाले. ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कुसळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गडाख यांनी आपल्या भाषणात यापुढे सोनई भागातील वीज, पाणी व रस्ते या मूलभूत प्रश्नाला अग्रक्रम देण्याचे काम करु. नारळ न फोडता प्रत्यक्ष विकासाचे काम करु मगच उदघाटन करू, असे सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com