Ahmednagar : जिल्हा परिषद पंतसंस्था निवडणूक रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election
नगर- जिल्हा परिषद पंतसंस्था निवडणूक रंगणार

जिल्हा परिषद पंतसंस्था निवडणूक रंगणार

नगरः नगर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक कणा असणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत रंगत येणार आहे. सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. २१ जागेसाठी १६८ अर्ज दाखल झाले आहेत. ८ डिसेंबरला अर्ज माघारीची तारीख असल्याने त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.

नगर जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था ही जिल्ह्यात नावाजलेली पतसंस्था आहे. शंभर टक्के वसुली असणाऱ्या या संस्थेवर वर्चस्व ठेवण्यासाठी चढाओढ असते. सध्या या ठिकाणी श्री गणेश मंडळाची सत्ता आहे. त्यांनी मागील पंचवार्षिकला सलग ११ वर्ष सत्ता असणाऱ्या पावन गणेश मंडळाचा पराभव केला होता. सध्या संजय कडुस संस्थेचे अध्यक्ष आहेत. कडुस यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली नव्याने पॅनेल उभे केले आहे.

संस्थेसाठी १९ डिसेंबरला मदतान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. २१ जागांसाठी १६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या वेळी इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहेत. मात्र ८ तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. माजी अध्यक्ष सुभाष कराळे, विजय कोरडेही स्वतंत्र पॅनेल घेऊन रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top