
जिल्हा परिषदेतील लिफ्ट कालबाह्य झाले असून ते कोरोना काळात बंद करण्यात आले आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेतील लिफ्ट कालबाह्य झाले असून ते कोरोना काळात बंद करण्यात आले आहे. हे बंद असलेले लिफ्ट ज्येष्ठ अभ्यंगत व दिव्यांगांसह पदाधिकाऱ्यांनी सुरू करण्याची केली. त्यामुळे प्रशासनाने जुने लिफ्ट तात्पुरते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाकाळात जिल्हा परिषदेतील लिफ्ट बंद करण्यात आले ते आजपर्यंत बंदच आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज जून महिन्यांपासून पूर्ववत सुरू झाले आहे. जिल्ह्यातील नागरिक विविध कामांसाठी जिल्हा परिषदेमध्ये येत आहेत. लिफ्ट बंद असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लिफ्ट त्वरित सुरू करावे, अशी मागणी अभ्यंगतांमधून होत आहे.
याबाबत "सकाळ'नेही लिफ्ट प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन लिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे 20 ते 25 हजाराचा खर्च येणार असून खर्चाचे नियोजन करून त्वरित लिफ्ट सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आता प्रत्यक्ष कामकाजाला प्रशासनाने सुरुवात केली आहे. येत्या आठ दिवसांत लिफ्ट सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.
संपादन : अशोक मुरुमकर