
अमरापूर : वाघोलीत (ता. शेवगाव) सर्वत्र बहरलेली वनराई, पावसाचे दुर्भिक्ष असतानाही तुडुंब भरलेल्या विहिरी व हिरवाईने नटलेली स्मशानभूमीचा परिसर पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी समाधान व्यक्त केले. पर्यावरण, जलसंधारण, वृक्षसंवर्धन व अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर अशा पर्यावरणपूरक विकासकामांचे त्यांनी कौतुक केले.