मनपा कर्मचाऱ्यांनाही कोरोणा विषाणूने घेरले, कंटेन्मेंट झोनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची धास्ती

Akola Corporation employees also infected with corona virus, coronary fever among employees working in containment zones
Akola Corporation employees also infected with corona virus, coronary fever among employees working in containment zones

अकोला : महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी तसेच कोरोना संक्रमीत रूग्णांना जी.एम.सी.येथे भरती करणे, कंटेन्मेंट भागामध्ये सर्व्हेक्षण करणे, कोरोना संक्रमीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मनपा कर्मचाऱ्यांनाही विषाणूचा संसर्ग झाला. त्यामुळे मनपा कर्मचारी धास्तावले आहेत. आयुक्तांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली.


कंटेन्‍मेंट भागात राहणाऱ्या नागरिकांमध्‍ये सर्दी,ताप, खोकला व कोरोना सदृश्‍य लक्षणे असलेल्‍या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोरोनाची चाचणी करून घेणे. गरजूंना वैद्यकीय सेवा पुरविणे, कंटेन्मेंट भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करणे, प्रभागातील स्वच्छता, तसेच शहरातील नागरिकांना मनपाकडून देण्यात येणाऱ्या मुलभुत सोई-सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारचा तुटवडा होऊ नयेत यासाठी मनपा अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र हायरिस्कमध्ये काम करीत आहे. मनपातील एका आरोग्य निरीक्षकाला २६ मे रोजी कोरोनाची लागण झाल्याने त्याला जी.एम.सी.येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले.

बुधवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तेथे भेट दिली व कर्मचाऱ्याचे प्रकृती बाबत डॉक्टरांशी चर्चा केली. या आधी २५ मे रोजी मनपा वैद्यकीय आरोग्य विभागामधील एक वैद्यकीय अधिकारीला कोरोनाची लागण झाली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com