पॉझिटिव्ह अहवालांची साडेपाचशेकडे वाटचाल, पुन्हा सहा पुरुषांसह दोन महिला आढळल्या बाधित

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 29 May 2020

अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सध्या आकडा साडेपाचशे कडे वाटचाल करीत असून येत्या काही दिवसात हेसुद्धा तूट भरून निघणार असल्याचे चित्र आहे अशातच शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सहा पुरुषांसह दोन महिला बाधित आढळला असून आता अकोल्यात एकूण रुग्ण संख्या 524 वर जाऊन पोहोचली आहे.

अकोला  : अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सध्या आकडा साडेपाचशे कडे वाटचाल करीत असून येत्या काही दिवसात हेसुद्धा तूट भरून निघणार असल्याचे चित्र आहे अशातच शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सहा पुरुषांसह दोन महिला बाधित आढळला असून आता अकोल्यात एकूण रुग्ण संख्या 524 वर जाऊन पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 157 अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये 8 अहवाल हे पॉझिटिव आले असून 149 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

शुक्रवारी सकाळी प्राप्त आठ पॉझिटीव्ह अहवालात सहा पुरुष व दोन महिला आहेत. यातील दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत. उर्वरित जठारपेठ, कौलखेड,  गोरक्षण रोड,  जुने शहर, न्यु खेतान नगर कौलखेड, हरिहरपेठ येथील रहिवासी आहेत.

अशी आहे सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५२४
मयत-२९(२८+१),डिस्चार्ज-३४९
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४६


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive reports circulate in Akola, two women found with six men again

Tags
टॉपिकस
Topic Tags: