काय म्हणता ? कोरोना वाढीसाठी राज्य सरकार जबाबदार, कोणी म्हटले असे, वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

महाराष्ट्र कोविड-19 च्या विरोधात संघर्ष करीत आहे. संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू हे दुर्देवाने महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. याला राज्य सरकारचे नेतृत्वाचे होत असलेले दुर्लक्ष कारणीभूत असून राज्य सरकारच्या नाकर्ते पणामुळे जनतेची दयनीय अवस्था झाली असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

अकोट (जि. अकोला) : राज्यात कोवीड-19 वाढीसाठी राज्य सरकार, मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा घणाघात अकोट भाजपच्यावतीने महाविकास आघाडीवर चढविण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

क्लिक करा- लॉकडाऊनचे सुखद परिणाम, रिकाम्या हातांना दिला शेवटी शेतीनेच आधार!

शेतकऱ्यांचा त्रास दूर करण्याची मागणी
कोविड-19 च्या कालावधीमध्ये मतदार संघातील शेतकऱ्यांचा हरभरा, तूर, मका खरेदी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळणे, पीक विमा, प्रधानमंत्री किसान योजनेमधील रक्कम खात्यात जमा न होणे, पीक कर्जाच्या अटी बद्दल शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर त्रास दूर करण्याचीही मागणी आमदार भारसाकळे यांनी केली आहे. महाराष्ट्र कोविड-19 च्या विरोधात संघर्ष करीत आहे. संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू हे दुर्देवाने महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. याला राज्य सरकारचे नेतृत्वाचे होत असलेले दुर्लक्ष कारणीभूत असून राज्य सरकारच्या नाकर्ते पणामुळे जनतेची दयनीय अवस्था झाली असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, तालुकाध्यक्ष अशोकराव गावंडे, शहराध्यक्ष कनक कोटक, जिल्हाउपाध्यक्ष प्रभाकरराव मानकर, विनायकराव भोरे, राजेश नागमते, राजेश रावणकर, उमेश पवार, मधुकर बोडखे, कुसुम भगत, भरत शुक्ला, नगरसेवक मंगेश चिखले, मंगेश लोणकर, योगेश नाठे, बाळासाहेब घावट, चेतन मर्दाने, रवींद्र केवटी, हरिष टावरी, जितुकुमार जेसवाणी, विठ्ठल वाकोडे, राधेश्‍याम यावलकर, किशोर सरोदे, गोपाल मोहोड, अमोल बोंडे उपस्थित होते.

हेही वाचा- अरे व्वा...! बी-बियाणे, खते पुरवठ्यातून बेरोजगार हातांना काम!

अवकाळीची नुकसान भारपाई द्या
अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, रेशनकार्ड मधील बरीच नावे आरसी मधून कमी झाले असून ते त्वरित समाविष्ट करण्यात यावे. प्रधानमंत्री किसान योजनेमधील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये लाभाचे पैसे, पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावा. गारपिटीमध्ये फळबागेची झालेली नुकसान भरपाई फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करण्यात यावी, पीककर्जा करिता शेतकऱ्यांना बँकेने ज्या अटी घातल्या आहेत त्या अटिची कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्तता करणे शक्य नसल्याने त्या शिथिल करण्यात याव्या अशा विविध मागण्या भाजपच्या निवेदनात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola BJP attacks CM