लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करता, मग व्हा कारवाईला समोर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

नागरिकांना सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, दुकानामध्ये पाच पेक्षा अधिक लोकांची गर्दी न होऊ देणे, पार्किंगची व्यवस्था करणे, दुचाकी वाहनावर डबल सीट प्रवास न करणे आदी अटी व शर्ती घालण्यात आल्या होत्या. शनिवारी पहिल्या दिवसापासून अंमलबजावणी करण्यात आली. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या, बेशिस्त नागरिक आणि व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अकोट (जि. अकोला) : प्रशासनातर्फे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून 5 जूनपासून नवीन नियमावलीनुसार सम-विषम तारखेला आस्थापने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यामध्ये नागरिकांना सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, दुकानामध्ये पाच पेक्षा अधिक लोकांची गर्दी न होऊ देणे, पार्किंगची व्यवस्था करणे, दुचाकी वाहनावर डबल सीट प्रवास न करणे आदी अटी व शर्ती घालण्यात आल्या होत्या. शनिवारी पहिल्या दिवसापासून अंमलबजावणी करण्यात आली. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या, बेशिस्त नागरिक आणि व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

क्लिक करा- लॉकडाऊनचे सुखद परिणाम, रिकाम्या हातांना दिला शेवटी शेतीनेच आधार!

पोलिस आणि न.प. ची संयुक्त कारवाई
रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या आठवडी बाजारातील चार ते पाच भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने पालिका प्रशासनातर्फे जमिनदोस्त करण्यात आली. यावेळी शिवाजी चौक ते जयस्तंभ चौक पर्यंतच्या परिसरात फळे विकणाऱ्या हातगाडी धारकांवर, परवानगी नसताना दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यवसायिकांवर, पार्किंगची व्यवस्था न करणाऱ्या आस्थापनावर, मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रविवारपासून शिवाजी चौक ते जयस्तंभ चौकापर्यंतचा मार्ग हा दुचाकी, चारचाकी तथा फेरीवाल्यांसाठी बंद करण्यात आला असून, सदर आदेशाचा उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले. विशेष म्हणजे शनिवारपासून लागू झालेल्या नवीन नियमावलीची अमलबजावणी करण्यासाठी पालिका प्रशासन तथा पोलिस प्रशासनातर्फे संयुक्त कारवाई करण्यात आली असून, यावेळी पालिका मुख्याधिकारी डोल्हारकर तथा पोलिस निरीक्षक संतोष महल्ले स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करण्यास सुरुवात केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Police action against violators