esakal | ऐकावे ते नवलंच! या शहरात कोट्यावधींच्या जागा मिळतात फुकट!
sakal

बोलून बातमी शोधा

Billions of seats are available in this city for free washim akola marathi news

शहरामध्ये पालिकेच्या मालकीच्या असलेल्या व बाजारमुल्यानुसार कोट्यवधी रुपयांच्या जागा शहरातील भूमाफीयांनी बळकावल्या आहेत. मुख्यम्हणजे या जागांवर बांधकाम होऊन त्याचा व्यावसायिक वापरही सुरू झाला आहे. या भूमाफियांना फक्त राजाश्रय मिळाला आणी कोट्यावधींच्या जागा फुकटात मिळाल्यात. 

ऐकावे ते नवलंच! या शहरात कोट्यावधींच्या जागा मिळतात फुकट!

sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम : शहरामध्ये पालिकेच्या मालकीच्या असलेल्या व बाजारमुल्यानुसार कोट्यवधी रुपयांच्या जागा शहरातील भूमाफीयांनी बळकावल्या आहेत. मुख्यम्हणजे या जागांवर बांधकाम होऊन त्याचा व्यावसायिक वापरही सुरू झाला आहे. या भूमाफियांना फक्त राजाश्रय मिळाला आणी कोट्यावधींच्या जागा फुकटात मिळाल्यात. 

वाशीम शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहरामध्ये पाटणी चौक, रिसोड नाका, लाखाळा परिसर ते शिवाजी चौकापर्यंतचा भाग व्यापारपेठ म्हणून ओळखली जाते. या व्यापारपेठेच्या आजूबाजूला पालिकेच्या मालकीच्या कोट्यवधींच्या जागा होत्या. मात्र, गेल्या पाच वर्षात या जागांवर पक्की बांधकामे झाली आहेत. टिळक उद्यानाची जागाही अशीच झळकविण्यात आली आहे. बालाजी कॉम्प्लेक्स समोरली नंदी जवळील मोठी जागा परस्पर हडपण्यात येऊन त्या ठिकाणी पक्के बांधकाम करून त्याचा व्यावसायिक वापरही सुरू झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शहरामध्ये गेल्या पाच वर्षात व्यापारी संकुलाच्या साखळ्या भूमाफीयांकडून उभ्या करण्यात आल्या. या व्यापारी संकुलाच्या जागा इनामीवतनातील होत्या. तसेच काही जागा पुरातनवास्तुच्या व पुरातत्त्व विभागाने जाहीर केलेल्या संरक्षित वास्तूच्या पाचशे मिटर अंतराच्या आत असूनही येथे चार-चार मजली व्यापारी संकुले उभी राहिली आहेत. अन्नपूर्णाबाई राठी मार्गावर चक्क नाल्यावरच स्लॅब टाकण्याचा प्रताप भुमाफीयांनी केला आहे. 
 

मुद्रांक शुल्कावर दुकानांचा ताबा 
ज्या भूमाफीयांनी सत्तेचा वापर करून कागदोपत्री खाडाखोड केली व जागा बळकावल्या त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या व्यापारी संकुलातील दुकाने विक्री करताना मालकीचा पुरावा नसल्याने केवळ शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर थातूरमातूर व्यवहार दाखविण्यात आले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणांची चौकशी करणे गरजेचे आहे. 
 

राजकारण केवळ भूखंडासाठी 
वाशीम शहरामध्ये गेल्या दहा वर्षात अनेक लोकप्रतिनिधी उगवले आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी भूमाफीयांकडून नेते झालेल्या या राजकारण्यांनी शहरातील मोक्याचे भूखंड ताब्यात घेऊन वत्सगुल्म नगरीच्या पर्यावरणाचा सत्यानाश केला आहे. आधीच अडीचशे कोटींच्या कंत्राटातील टक्केवारीसाठी भूमिगत गटार योजनेचे भूत शहराच्या मानगुटीवर बसविल्याचे पाप केल्यानंतर पालिकेच्या मोकळ्या जागा चेल्याचपाट्यांना वाटण्याचा गोरखधंदा बिनबोभाटपणे सुरू आहे.