esakal | बुलडाणा जिल्ह्यात आणखी पाच जण पॉझिटिव्ह; ग्रामीण भागात विळखा वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

COVID19 in buldana.jpg

आतापर्यंत 1750 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 118 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे. आतापर्यंत 77 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात आणखी पाच जण पॉझिटिव्ह; ग्रामीण भागात विळखा वाढला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 46 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 41 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 05 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील 33 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण आणि 22 वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातील चिखली येथील 25 वर्षीय तरुण रुग्णाचे आहेत.

त्याचप्रमाणे आज मलकापूर येथील पारपेट भागातील 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान बुलडाणा येथे कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या पाच झाली आहे. या व्यक्तीला 12 जून रोजी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

महत्त्वाची बातमी - लहान भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकली अन् मोठ्यानेही सोडला प्राण

तसेच आतापर्यंत 1750 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 118 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे. आतापर्यंत 77 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 77 आहे. सध्या रुग्णालयात 36 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार  सुरू आहेत.

तसेच आज 14 जुन रोजी 46 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 05 पॉझिटिव्ह, तर 41 निगेटिव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  119 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1750 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.