esakal | लहान भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकली अन् मोठ्यानेही सोडला प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola marathi news When he heard the news of his younger brother's death, he also gave up his life

आॅटो चालक लहान भावाचा भर रस्त्यात शुक्रवारी (ता.१२) दुपारी मृत्यू झाला. ही वार्ता मोठ्या भावाला कळताच त्यांना याचा जोरदार झटका बसला. यामध्ये त्यांचाही मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अकोल्यात घडली.

लहान भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकली अन् मोठ्यानेही सोडला प्राण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : आॅटो चालक लहान भावाचा भर रस्त्यात शुक्रवारी (ता.१२) दुपारी मृत्यू झाला. ही वार्ता मोठ्या भावाला कळताच त्यांना याचा जोरदार झटका बसला. यामध्ये त्यांचाही मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अकोल्यात घडली.


मो.फिरोज अब्दुल सत्तार (वय ३७, रा.नवाबपुरा) हे दुपारी बारा वाजता खुले नाट्यगृहाजवळ आॅटो चालवित असताना त्यांचा यावेळी अचानक मृत्यू झाला. ही घटना घडताच त्यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मात्र, यामध्ये खुप वेळ गेल्याने फिरोज यांचा मृत्यू झाला. मृत्यूची वार्ता त्यांचे मोठे बंधू मुहम्मद अब्दुल सत्तार (वय ४४) यांना कळताच त्यांना याचे अतिव दुःख झाले. यामध्ये त्यांचाही मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन्ही भावाचा मृत्यू झाल्याने सत्तार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

हेही वाचा -  अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची काँग्रेसवर कुरघोडी